पोलिसांच्या घरांचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई – पोलिस हा महत्वाचा घटक असून त्यांच्या हक्काचे घर त्यांना मिळावे यासाठी दोन वर्षापूर्वी पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला आहे. पोलिस विभागाच्या जागेबाबत पुणे महानगरपालिकेने तडजोड करून पोलिसांच्या घरांचे बांधकाम येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, महापौर मुक्ता टिळक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (1) नितीन करीर, प्रधान सचिव (2) मनीषा म्हैसकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते,मनपा आयुक्त कुणाल कुमार, गृहविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
महापालिकेने व पीएमआरडीएने ग्रामीण पोलिसांची जागा घेऊन त्यांची वसाहत बांधून द्यावी. यामध्ये व्यावसायिक आणि पोलिस वसाहत असे करता येईल. औंधला असणारा 700 घरांचा प्रकल्प त्वरित साकारला पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट सिटीसंदर्भात सर्व आमदार व नगरसेवक यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर सादरीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुणे विद्यापीठ चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी 1.9 किमीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे,त्याचे काम मनपाने, पीएमआरडीए किंवा मेट्रो कोणीही एकाने करावे. मात्र मेट्रो स्टेशनमधून थेट विद्यापीठात कसे जाता येईल, हे पहावे. शिवाय स्वारगेटप्रमाणे शिवाजीनगर चौकातही उड्डाणपुलाची उभारणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)