पोलिसांच्या कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल

नागठाणे- कर्तव्य बजावत असताना पोलिसाला शासकीय कामात अडथळा आणून अंगावर धावून जात शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी नागठाणे, ता. सातारा येथील युवकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहिद समीर मुलाणी (वय 28, रा. नागठाणे, ता. सातारा) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार बाळासाहेब काळू पवार यांनी दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासो पवार व पोलीस नाईक राजू शिंदे हे पुणे-बेंगलोर महामार्गावर माजगाव फाटा येथे वाहनांवर केसेस करत होते. यावेळी कराड बाजूकडून येत असलेल्या एका टेम्पोला तपासणीसाठी त्यांनी थांबवले. टेम्पो चालक दत्ता सुदाम चव्हाण (रा. लांजेश्वर, उस्मानाबाद) यांच्याकडे कागदपत्रे विचारणा करत असतानाच टेंपोत मागे बसलेला युवक खाली उतरून तेथे आला आणि “गाडी कशाला अडवली, तु मला ओळखले नाही का? मी अजमेरचा भाऊ आहे. गाडी सोडून दे. पोलिसांना लय मस्ती आली आहे, असे म्हणत आणि आरडा-ओरडा करू लागला. तसेच त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ व दमदाटीही केली. यावेळी त्यांनी त्याला नाव पत्ता विचारले असता उर्मट उत्तरे दिली. यानंतर या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात देऊन संबंधित युवकाला बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याने स्वतःचे नाव शहिद समीर मुलाणी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुलाणी याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए. खान करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)