पोलिसांच्या उदासीनतेपुढे आमदार हतबल

-भर विधानसभेत रडून अध्यक्षांना सांगितली कैफियत


-तक्रार दाखल करूनही महिन्याभरापासून पोलिसांची चालढकल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लखनौ – वाहनातून 10 लाख रुपयांची चोरी होऊनदेखील पोलिसांनी आपली तक्रार नोंदविली नसल्याचे आजमगढच्या मेहनगरचे आमदार कल्पनाथ पासवान यांनी विधानसभेत हात जोडून रडत रडत सांगितले. उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचे आमदार पासवान विधान सभेत रडू लागल्याने विचित्र स्थिती उद्‌भवली.

एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून पोलीस स्थानक तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारून थकलोय; परंतु आजपर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. तसेच एफआयआर देखील नोंदविलेला नाही असे म्हणत असताना पासवान यांना अश्रू अनावर झाले. यादरम्यान बाजूला बसलेल्या अन्य आमदारांनी त्यांचे सांत्वन केले.
न्याय न मिळाल्यास निश्‍चितपणे मी मरून जाईल. आज मी सभागृहात रडत आहे, उद्या पूर्ण सभागृह रडणार आहे. पूर्ण सभागृहाला मी हात जोडून विनंती करत आहे. मी एक गरीब शेतकरी असून माझे पैसे मिळवून द्या. अन्यथा मी मरून जाईन असे आमदाराने रडत रडत सांगितले.

असे समजले जाते की स्वतःचे घर उभारण्यासाठी बॅंक खात्यातून 10 लाख रुपये काढले त्यांनी महिनाभरापुर्वी काढले होते. होते. ही रक्‍कम सोबत घेत बसमधून आपण आझमगढला पोहोचलो. तेथे बसमधून उतरल्यावर एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो होतो. हॉटेलमधून बाहेर पडतेवेळी बॅग हातात घेतली असता ती हलकी वाटली. संशय वाटल्याने बॅग उघडली असता त्यातील रक्‍कम गायब होती, असा दावा आमदाराने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली त्यांनी गुन्हा नोंदविला नाही, असा आरोप पासवान यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)