पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली

चिंबळी- खेड तालुक्‍यात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने चाकण, महाळूंगे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी परिसरात बाहेरगावावरुन नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक जण राहण्यासाठी येत असतात. त्यामुळे घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात व पंचक्रोशीत आहे. मालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद पोलिस स्टेशनला द्यावी असे आदेश मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने दिले होते.त्यांनंतर भाडेकरुची माहीती न देणाऱ्या काही घरमालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, माहिती देणे बंधनकारक असतानाही घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहरात भाड्याने घर मिळणे अवघड होत असल्याने भाडेकऱ्याकडून शहरा लगतच्या ग्रामीण हद्दीतील घरांचा पर्याय निवडला जातो आहे. चिंबळी, केळगाव, मोशी पंचक्रोशीत यामुळे राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. अनेक जण राज्य व परराज्यातून चाकण, पिंपरी-चिंचवड, आळंदी भागात व्यापार, व्यावसाय व नोकरीसाठी येत आहेत. शहरात आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. त्यामुळे अनेक जण घर भाड्याने घवून राहात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी व सुरक्षेच्या दृष्टिने परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची माहिती असावी यामुळे मध्यंतरी पोलीस प्रशासनाने घर भाड्याने दिलेल्या व्यक्‍तींची संपुर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी असे आदेश काढले होते. त्यामुळे घर भाड्याने दिलेल्या प्रत्येक घरमालकाला आपल्या भाडेकरुंची माहिती देणे बंधनकारक झाले आहे. याबाबत नोंद करणे अतिशय सुलभ व्हावे यासाठी घरपोच फॉर्मचा व थेट ठाण्याशी संपर्क साधण्याचा पर्यायही पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरीही त्याबाबत स्थानिकांमध्ये अज्ञभिंता असल्याचे दिसून येते.परिणामी तो हि पर्याय निरर्थक ठरत असून भाडेकरुंच्या नोंदीच या परिसरात अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येत नाहीत.आळंदी पंचक्रोशीत स्थानिक नागरिकांच्या हजारो खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत.केळगाव,चिंबळी,चऱ्होली या भागात तर केळगाव – आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावर खोल्या देण्यात आल्या आहेत. सतत बदलणाऱ्या भाडेकरुंमुळे घरमालकांमध्ये त्यांची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा असल्याचे दिसून येतो. पुणे,पिंपरी शहरात हि मोहीम प्रभावी पणे राबवली जात असताना आळंदी,चिंबळी,केळगाव भागातील गावकऱ्यानमध्ये मात्र याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.

  • का हवी नोंद?
    आपल्या घरात भाड्याने राहणारा व्यक्ती कुठला व कोणत्या राज्यातील आहे. त्याने सांगितलेली ओळख सत्य आहे का ? त्याची आपल्या खोलीत राहण्यास येण्यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही ना ? एकादा गुन्हा करून तो पळाल्यास अपूर्ण माहिती अभावी त्याचा शोध थांबू नये व सुरक्षेसाठी त्याची नोंद घरमालकाकडे व जवळच्या पोलीस ठाण्याला असावी या करिता भाडेकरुंची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
  • अशी करा नोंद
    नोंद करण्याबाबत सक्‍ती व निश्‍चित वेळ व तारखेची मर्यादा घालण्यात आली नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून भाडेकरुंची नोंदणी उपलब्ध फॉर्म वरिल माहिती भरून व भाडेकरूची ओळखीचे कागदपत्रे जोडून करायची आहे. यासाठी पोलीस ठाण्याकडूनही सहकार्य केले जाणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)