पोलिसांचे छापासत्र, 3 जणांना अटक

नगर – राज्य उत्पादन शुल्क व शहर पोलिसांनी संयुक्‍तरीत्या हॉटेल तपासणी मोहिमेत तीन हॉटेलमधून विविध कंपन्याची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई चितळे रोड व नगर-कल्याण रोड येथे करण्यात आली.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक पराग नवलकर, अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, पोलीस उप अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छापे टाकण्यात आले. या छापासत्रामध्ये एकूण 10 हॉटेलची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चितळे रोडवरील एका हॉटेलमधून 1 हजार 60 रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त करून, एकास ताब्यात घेण्यात आले. नगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेलमध्ये दारू विक्री करताना एकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 720 रूपये किंमतीच्या 4 बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याच रस्त्यावरील आणखी एका हॉटेलमधून बिअर आणि देशी दारू असा 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व एकास ताब्यात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)