पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट’

पिंपरी – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल 389 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत परिमंडळ तीन मधील 50 अधिकारी आणि 400 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम गुरुवारी (दि. 28) रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली.

परिमंडळ तीनमधील सर्व पोलीस ठाण्यात ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 31 तडीपार गुंडांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी एकजण आढळून आला असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. 44 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील 15 आरोपी पोलिसांच्या हाती लागले. माहितगार 152 गुन्हेगारांना तपासण्यात आले, त्यातील 50 जण सापडले. रेकॉर्डवरील व इतर 57 गुन्हेगार तपासले असता 20 गुन्हेगार आढळून आले. वॉरंट बजावण्यात आलेल्या 29 आरोपींपैकी 2 आरोपी मिळाले. तसेच 22 संशयितांवर कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणाऱ्या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालवणाऱ्यांना तपासण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागांमध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहीम राबविली. मिळालेल्या 279 गुन्हेगारांपैकी 77 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 68/69 प्रमाणे कारवाई करण्यात आली. 113 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 आरडब्ल्यू अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर 76 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 110/112/117 अंतर्गत कारवाई करण्यात आली. 102 प्रमाणे 10 तर मुंबई प्रोव्हिजन ऍक्‍ट कलम 85 (1) प्रमाणे 3 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)