पोलिसांची वाहन चालकांना साद

पिंपरी – शहरात वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे वाहन चालकांचे प्रमाण जास्त आहे. वाहतुकीचे सर्व नियम वाहन चालकांनी पाळावेत यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने शहरात प्रमुख चौकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या जगजागृती अभियानांतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोलीस निरीक्षक आर. एस. निंबाळकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एच. भागवत यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर जनजागृती अभियानाचे स्टिकर्स लावले. यावेळी पोलीस नाईक आर. पी. हांडे, एस. आर. साळुंके, पोलीस शिपाई पी. एच. चोरमले आदी उपस्थित होते.

-Ads-

वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे, सिग्नलचे पालन करावे. वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करु नये. दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा. चौकात सिग्नलला वाहन उभे करताना झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यावर थांबू नये. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, अंध, अपंग व्यक्तींना तसेच पादचाऱ्यांना प्रथम रस्ता ओलांडण्यास प्राध्यान्य द्यावे. वाहन चालकाचा परवाना, वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहन प्रदुषण चाचणी प्रमाणपत्र नेहमी बरोबर ठेवावेत. शाळा, दवाखाना, रुग्णालय अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नये. तसेच शहरातील ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यास सर्वांनी नियमाचे पालन करुन सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक निंबाळकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत यांनी यावेळी सर्व आवाहन नागरिकांना केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)