पोलिसांची आळंदी ते पंढरपूर सायकल वारी

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

वाघापूर, दि. 20 (प्रतिनिधी) -संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक यंत्रणा आपापल्या पद्धतीने सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांचे नियोजन नीटनेटके असते. त्याचबरोबर स्थानिक यंत्रणांना पालखी काळात कोणत्या अडचणी आहेत आणि त्यावर काय उपाय योजना करता येईल, या गोष्टी जाणून घेण्यासाठी या वर्षी पालखी मार्गावर सायकल वारीचे आयोजन केले आहे. असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान सुरु झाल्यानंतर सोमवारी (दि. 19) त्यांचे सायकलवरून दिवे घाटातून सासवडमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पुणे येथील अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, पुरंदर दौंडचे प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी डॉ. सचिन काळे, सासवडचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे, नारायण गीते, अण्णासाहेब टापरे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर नांगरे पाटील यांनी नगरपालिका सभागृहात येऊन पालखी सोहळ्याबाबत बैठक घेऊन सर्व शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला. तसेच सायंकाळी सहा वाजता त्यांनी सायकलवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी त्यांच्या समवेत होमगार्डच्या माजी जिल्हा समादेशक आणि एनसीसीचे कॅप्टन प्रा. दीपक जांभळे, तसेच एनसीसी महाराष्ट्र बटालियन 36 आणि 3 महाराष्ट्र नेव्हिल एनसीसीचे एकूण 30 जवान तसेच सासवडचे पोलीस कर्मचारी यांनी जेजुरी येथील पालखी तळापर्यंत सायकल वारीमध्ये सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)