पोलिसांचा “हडपसर पॅटर्न’

गोळीबार करणाऱ्या टिपू पठाणची काढली धिंड
पुणे,दि.12- बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून त्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या साथीदारांची हडपसर पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात मोठी दहशत आहे. तो व त्याचे साथीदार परिसरात नेहमी शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवत असतात. यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही. त्यास हडपसर पोलिसांनी धिंड काढत पोलिसी खाक्‍या दाखवला. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
बांधकाम व्यावसायिकाची मुलगा नीलेश बिनावत व त्याचे मित्र काही दिवसांपूर्वी रात्री पानटपरीजवळ थांबले होते. त्यावेळी पठाणने त्यांच्याजवळ येऊन आपल्याला ओळखत नाही का ? असा प्रश्‍न केला. त्यावर बिनावतने ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पठाणने बिनावतला जबर मारहाण केली. त्यानंतर बिनावत हा त्याची गाडी घेऊन पोलिस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळीबार केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने पठाण व त्याच्या साथीदारांना राजस्थान येथून अटक केली होती.
गुन्हेगारांवर वचक बसावा आणि सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी पोलिसांनी पठाण व त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकून शुक्रवारी सायंकाळी ससाणेनगर येथील लोहमार्ग ते सातवनगर या परिसरामध्ये धिंड काढली. गुन्हेगारांची ही धिंड बघण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. गाजत असलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटातही असाच प्रसंग आहे. यामुळे याची चर्चा दिवसभर हडपसर परिसरात होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)