पोलिसांचा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

म्हसवड – म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनी अस्ताव्यस्त गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. म्हसवडमध्ये तब्बल एक महिने चालणाऱ्या यात्रेचा मुख्य दिवस दहा दिवसांवर आला आहे. यात्रेनिमित्त दररोज हजारो भाविक भेट देत असल्याने मंदिर परिसरासह शहरात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यातच बेशिस्त पार्किंगची भर पडत आहे. त्यामुळे म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि शहाजीराजे गोसावी व पोलिस कर्मचाऱ्यांनी बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. बसस्थानकासमोरील अस्ताव्यस्त गाड्यांवर कारवाई केल्याने या परिसराने मोकळा श्‍वास घेतला.

श्रीसिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीची सिध्दनाथ यात्रा 8 रोजी होत आहे. यादिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 5 ते 6 लाख भाविक यात्रेला उपस्थित रहात असतात. अनेक भाविक खाजगी वाहनाने तर काही एसटीने येत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत सिद्धनाथ मंदीर ते शिवाजी चौक मार्गे मुख्य पेठेतून सरकारी दवाखाना वेशीपर्यंत तर सिध्दनाथ मंदीर ते विठ्ठल मंदिर मार्गे एसटी स्टॅंडवर जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत. या मार्गावर पार्किंग करू नये, असे आदेश दिले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)