पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर वार

पिंपरी – पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून 30 वर्षीय तरुणावर वार करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.25) सायंकाळी वाल्हेकरवाडी येथे घडली.

या प्रकरणी प्रदीप दादासाहेब पळसकर (वय-30, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) याने फिर्याद दिली असून निलेश भाऊसाहेब कोळपे (वय-32, रा. शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळपे हा सराईत गुन्हेगार असून त्याला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक करत सोने हस्तगत केले होते. पोलिसांना आपल्याबाबत पळसकर याने माहिती दिली असा संशय कोळपे याला होता. पळसकर हा मंगळवारी सायंकाळी वाल्हेकरवाडी येथील शिवले चाळीजवळ शेतात मित्रांसह बिअर पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी कोळपे त्याठिकाणी आला. कोयत्याने त्याच्या मानेवर वार केले. यामध्ये पळसकर गंभीर जखमी झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)