पोलिसांकडून राजेगावत गरजूंना गणवेश वाटप

राजेगाव- राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना पोलीस खात्यात कार्यरत असलेले बापू नारायण इंदलकर यांनी गणवेश वाटप केले. शासनाच्या वतीने सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले आणि द्रारिद्य्ररेषेखालील पालकांच्या मुलांनाच दरवर्षी दोन गणवेशासाठी अनुदान दिले जाते; परंतु या निकषात न बसणारे परंतु खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. ही गरज ओळखून बापू इंदलकर यांनी राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील 33 विद्यार्थ्यांना गणवेश दिले.
लहानपणी आर्थिक अडचणीमुळे कपडेही घालायला नव्हते. संघर्ष करीतच शिकलो. आज परिस्थिती सुधारली; पण गरीब परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडसर येऊ नये, या भावनेतून मदत केली, असे यावेळी इंदलकर यांनी सांगितले. यावेळी बापू इंदलकर, शिवाजी मोरे, बापुराव थोरात, अनिल खैरे, शहाजी मेंगावडे, विनोद जाधव, मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे आणि इतर शिक्षक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)