पोलिसांकडून डिजे, डॉल्बीवर कथीत बंदी

उच्च न्यायालयात याचिका : राज्य सरकारला शुक्रवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबई: गणपती विसर्जन मिरवणूकांमध्ये डिजे अथवा डॉल्बींच्या वापरला पोलिसांनी घातलेल्या कथीत बंदी विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. या संदर्भात राज्य सरकारला शुक्रवारी भूमीका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या भुमीकेमुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवावेळी राज्य सरकार काय भुमीका घेते याकडे सा-यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

राज्यभरात गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत वाजविल्या जाणाऱ्या डिजे, डॉल्बी सांऊड सिस्टिम भाड्याने देणाऱ्यांवर पोलिसांकडून होत असलेल्या कारवाई विरोधात प्रोफेशनल ऑडियो आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संघटनेच्या वतीने ऍड. सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज प्राथमिक सुनावणी झाली.

यावेळी ऍड. तळेकर यांनी ध्वनी प्रदुषणा संदर्भात कायदा अस्तित्त्वात असताना ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादेत राहून डीजे अथवा डॉल्बी सिस्टिमचा वापर करणा-यांवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई ही बेकायदा असल्याचा आरोप केला. तसेच पोलीस आयोजकांविरोधात कारवाई न करता साऊंड सिस्टिम भाड्याने देणा-यांवर कारवाई करत आहेत. त्यांना नोटीसा बजावून त्यांची गोदामे सिल करीत आहेत. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

डिजे, डॉल्बी सांऊड सिस्टिमचा वापर हा गणेशोत्वाची सुरूवात झाली की विसर्जन मिरवणुकात केला जातो. या दरम्यानच पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी नोटीसा बजावून साऊंड सिस्टिमची गोदामे गणेशोत्सवापर्यंत सील करतात. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे व्यवसायावर गंडांतर येत असल्याने या व्यवसायामध्ये लाखो रूपयाची इलेक्‍ट्रॉनिक उपकरणं विकत घेणाऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल न्यायालयाने घेऊन राज्य सरकारला या संदर्भात भूमीका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)