माणसाने माणुसकी जपली पाहिजे. जात-पात ही मानवानेच निर्माण केली आहे. आज देशातून पोलिओ हद्दपार झाला म्हणून आपण मिरवतो, तशी जात नाही का हद्दपार होऊ शकत? असा प्रश्‍न करीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ‘या बहुचर्चित नाटकाच्या 700 व्या प्रयोगाच्या निमित्ताने ते बोलत होते.

मुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात हा प्रयोग पार पडला. शुभारंभाच्या प्रयोगापासूनच चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने मागील सहा वर्षांमध्ये विविध ठिकाणी प्रयोग करीत 700 प्रयोगांचा टप्पा गाठला. या कार्यक्रमाला निर्माता-अभिनेता भरत जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार दिलीप मोहिते-पाटील, पत्रकार युवराज मोहिते आदी मान्यवरांनीही हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)