पोलादावरील आयातशुल्क वाढणार? 

सोने आणि इतर वस्तूंची आयात कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न 
नवी दिल्ली: केंद्र सरकार रुपयाला आधार देण्यासाठी आता बरीकसारीक बाबीवर विचार करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी काही पोलादाच्या प्रकारावरील आयात शुल्क 15 टक्‍क्‍यांपर्यत वाढविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या या पोलादावर 5 ते 12.5 टक्‍के इतका आयात शुल्क आहे.
जर या पोलादाची आयात कमी झाली तर त्यासाठी लागणारे परकीय चलन वाचणार आहे. त्याबरोबर भारतात तयार होणे पोलाद उपयोगात येणार आहे. मात्र, हे पोलाद देशातील वापर करणाऱ्यांना काही प्रमाणात महागात पडण्याची शक्‍यता आहे. पोलाद मंत्रालयाला या विषयावर एक टिप्पण तयार करण्यास सांगितले असून त्यावर टिप्पण तयार करण्यात आले आहे. यावर लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या आठवड्यात रुपयाला सावरण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एकूणच अनावश्‍यक आयात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या विषयावर अनेक मंत्रालयात काम चालू असल्याचे सांगितले जाते.
भारतात तयार होणाऱ्या वस्तूसाठी भारतात तयार होणारा कच्चा माल वापरला जावा, असाही यामागे सरकारचा विचार आहे. पोलासावरील आयात शुल्क वाढण्याच्या शक्‍यतेने काल देशातील पोलाद कंपन्यांच्या शेअरच्या भावातही बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी भारताने 6.5 अब्ज डॉलरचे पोलाद आयात केले होते. भारताच्या पोलाद आयातीला अमेरिकेने विरोध केला आहे. भारतातील उद्योग ज्या देशातील पोलादाची आयात करतात त्यात द. कोरियाचा आणि जपानचा समावेश आहे.
सरकारने सोन्याच्या आयातीवर मर्यादा घालण्यासाठी अगोदरच अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, या धातूंची आयात अजूनही जास्त असल्याचे सरकारला वाटते. त्यामुळे सोन्याची अजूनही आयात जास्त असल्याचे सरकारला वाटते. त्यामुळे सोन्याची आयात आणखी कमीा करण्यासाठी सरकार प्रयत्न करण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला दागिने उत्पादकांचा विरोध आहे. कारण त्यामुळे दागिन्याच्या निर्यातीवर परिणाम होतो. असे त्याचे म्हणणे आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)