पोलादाचा वापर वाढण्याची शक्‍यता 

कोलकाता: जागतिक पातळीवर व्यापारक्षेत्रात वाढत असणाऱ्या तणावामुळे देशाअंतर्गत बाजारात स्टीलला मागणी वाढल्यास येत्या काळात भारतातील स्टील कंपन्यांना अच्छे दिन येणार असल्याचा अंदाज आयसीआरए यांनी आपल्या अहवालात मांडला आहे.
आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशातील स्टील निर्यात करण्याच्या टक्‍केवारीत 33 टक्‍के घसरण झाली आहे. आणि आयातीत 11 टक्‍क्‍यांनी वाढ दिसून आली आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर रुपयात मोठी घसरण झाल्याने स्टीलचे उत्पादनात आयातीचे प्रमाणात कमी होऊन आता निर्यात करण्यात वाढ होण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात विक्रीचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने आणि मान्सूनच्या अगोदर बांधकाम क्षेत्रात स्टीलला वाढती मागणी यातून पहिल्या तिमाहीत स्टीलचा खप वाढण्याच्या प्रमाणात 9.2 टक्‍के वाढ नोंदवण्यात आली आहे.
ग्रामीण क्षेत्रात पायभूत सुविधावर सरकारकडून खर्च वाढवण्यात आला असून आणि कमजोर रुपयाने देशातर्गत स्टीलच्या किमती येत्या काळात मजबूत होणार असल्याची माहिती आयसीआरए यांनी दिली आहे. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)