पोरी उचलण्याची भाषा सत्तेच्या मस्तीतून

खा. सुळे यांची टीका; हमीभाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार
अकोले – सत्तेची मस्ती आलेल्यांच्या तोंडी पोरी उचलण्याची भाषा. ती उतरवण्याची आमच्यात धमक आहे; पण अशी भाषा करणाऱ्याला शाबासकी व शेतमाला हमी भाव मागण्यासाठी दिल्लीला गेलेल्या शेतकऱ्यांवर लाठी हल्ला. हा मस्तीखोर कारभार आपण हटवला पाहिजे, असे आवाहन खा.सुप्रिया सुळे यांनी आज दुपारी केले. मोदी “व्होट’ व नोट घेवून गेले आहेत. हा निवडणुकीचा जुमला होता हे लक्षात घ्या. त्याचा वचपा घेण्याची वेळ जवळ येवून ठेपली आहे. त्यासाठी जनतेने योग्य व निर्णायक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी खा. सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी हेमलता पिचड होत्या. व्यासपीठावर माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, सीताराम गायकर, मधुकरराव नवले, राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शेणकर नावाच्या गृहस्थाने पाणीमिश्रीत रॉकेल अंगावर शिंपडून आत्महत्या करण्याचे नाट्य रंगले.
सुळे यांनी राज्य व केंद्र सरकारांच्या धोरणांवर सडकून टीका केली. “”आधारकार्ड सक्तीचे केल्याने अन्नधान्य मिळाले नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात उपासमारीने एक जण दगावला. मुली एरव्हीही असुरक्षित आहेत; पण आ. राम कदम, आ.प्रशांत परिचारक यांची उद्धामपणाची भाषा देशात अराजकेतची स्थिती आहे, हे दाखवणारी आहे,” असे सांगून त्या म्हणाल्या, की पेट्रोलचे दर दररोज वाढ आहेत. महागाईने गगन भरारी घेतली आहे. दुसरीकडे शेतमाला भाव नाही. “ेन खाऊँगा, न खाने दुँगा,’ अशी भाषा करणारे व सत्तेवर आल्यावर स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन मोदी विसरल आहेत. शहरी सुशिक्षित लोक हुंडा घेतात; मात्र अशिक्षित आदिवासी समाज व स्रिया यांपासून दूर आहेत. खरे पुरोगामित्व शहरात नसून आदिवासी भागात आहे.
आ. पिचड यांनी मुन्वर या विकृत कवीची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कशी समाविष्ट होते, असा सवाल केला. अकोले तालुका अवर्षणग्रस्त झाल्याने तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. “अच्छे दिन’, अन्नसुरक्षा, गॅस दरवाढ, शाळा बंद यावर त्यांनी प्रकाश टाकताना सरकारवर जोरदार टीका केली.
आशा पापळ यांनी प्रास्ताविक केले. हेमलता चासकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका महिला अध्यक्षपदी आशा पापळ, कार्याध्यक्षपदी अंजनाताई बोंबले व जिल्हा सरचिटणिसपदी नंदा धुमाळ यांच्या झालेल्या नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या व अन्य यशस्वी महिलांचा खा. सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आ. पिचडांना विकासाचा ध्यास

-Ads-

खा. सुळे यांनी आ. पिचड यांचा सुसंस्कृत, संवेदनशील व तालुका विकासाचा ध्यास घेतलेला आमदार जनतेला असा उल्लेख केला. माजी मंत्री पिचड व सौ पिचड यांनी असा आमदार पक्षाला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गेली 50 वर्षे मधुकरराव पिचड यांच्या पाठीशी राहणाऱ्या जनतेने आता आ.वैभव यांच्या मागे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)