पोरकटपणाने विश्वासदर्शक ठराव मंजुर – जयंत पाटील

मुंबई – विरोधी पक्षाने विधानसभेच्या अध्यक्षांवर दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर आणि कामकाजावर चर्चा झाली असती तर सरकारची लक्तरे निघाली असती म्हणूनच पोरकटपणाने अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मंजुर करण्यात आला. लोकशाहीचा खून यापूर्वी कधी झाला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

विधानसभेचे कामकाज कोणत्या पातळीवर गेले आहे हे लक्षात येत आहे. आम्ही अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर ठाम असून राज्यपालांकडे विरोधी पक्ष जावून आमचे म्हणणे मांडणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)