पोपनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले केरळच्या मदतीचे आवाहन

व्हॅटिकन सिटी – पुरग्रस्त केरळ राज्याला उदार मनाने मदत करा असे आवाहन पोप फ्रांसिस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. व्हॅटिकन मधल्या सेंट पीटर चौकात झालेल्या प्रार्थना सभेत त्यांनी केरळात पुरामुळे मरण पावलेल्यांसाठीही प्रार्थना केली.

केरळातील पुराने आणि तेथे त्यामुळे दरडी कोसळण्या सारख्या दुर्घटनांमुळे मोठे नुकसान झाले असून जीवितहानीही मोठी झाली आहे. अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. शेतातील पिके आणि घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या आपल्या आदग्रस्त बंधुभगिनींना मदत करणे आणि त्यांच्या विषयी सद्‌भावना व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने केरळला ठोस मदत केली पाहिजे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. केरळातील अनेक चर्च संस्था पुरग्रस्तांसाठी मोठे मदत कार्य करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)