पोन्झी घोटाळा प्रकरणी ईडीचे माजी उप संचालक आणि इतरांवर धाडी

नवी दिल्ली – 600 कोटी रुपयांच्या पोन्झी घोटाळा प्रकरणी आज सक्तवसुली संचलनालयाने माजी उप संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या निवासांवर धाडी टाकून झडती घेतली. पीएमएलए (प्रीव्हेन्शन ऑफ द मनी लॉंडरिंग ऍक्‍ट) अन्वये माजी अधिकारी गुरनाम सिंग, ऍडव्होकेट पुनीत शर्मा आणि एका अन्य व्यक्तींच्या चंदीगड आणि मोहाली येथील निवासांची झडती घेण्यात येत असल्याचे सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंग हे सक्तवसुली संचलनालयाच्या चंदीगड विभागाचे उप संचालक होते. पोन्झी प्रकरंणाचे ते तपासणी अधिकारी होते. मात्र शर्माच्या मदतीने त्यांनी 4 ते 6 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या संशयावरून त्यांना गेल्या वर्षी सेवेतूम कमी करण्यात आले होते. या प्रकरणी अधिक पुरावे जमा करण्यासाठी या धाडी टाकण्यात आल्यचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संस्थेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद सक्‍तवसुली संचलनालयाचे कार्यकारी संचालक कर्नाल सिंग यांनी दिली आहे.

गेल्यावर्षी सक्तवसुली संचलनालयाने या प्रकरव्णी अनेक धाडी टाकल्या होत्या आणि विट फंडाचा फरार एजंट कमल के बक्षी याला अटक केली होती.पोन्झी किंवा पिरॅमिड योजना प्रकरणात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची सुमारे 600 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मुगुंदम गंगम नावाच मलेशियन या प्रकरणाचा मास्टरमाईंड होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)