पोदारस्कूलमध्ये वैदिक गणितावर कार्यशाळा

बारामती- शहरातील नामांकित पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये हैदराबाद येथील ब्रेनोबिक्‍स एजुकेशन संस्थेच्या विद्यमाने विद्यालयातील इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वैदीक गणितावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गणित विषय क्‍लीष्ट समजला जातो. विद्यार्थ्यांची गणित विषयातील गोडी वाढावी यासाठी विद्यालय नेहमी वेगवेगळे उपक्रमांचे आयोजन करीत असते. या कार्य शाळेकरिता विद्यालयातील इयत्त 6 वी ते 9 वीच्या 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ब्रेनोबिक्‍स एजुकेशन संस्थेतर्फे विद्यार्थांना विशेष कार्य पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे प्रशिक्षक मो. अहमद व रीयाज यांनी तीन दिवसीय कार्यशाळेसाठी दररोज तीन तासांचे नियोजन केलेले असून विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया करताना जास्तीत जास्त अचूकता आणि गती कशी प्राप्त होईल याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या आयोजना बाबतीत विद्यालयाचे प्राचार्य मनोहर महाजन यांनी समाधान व्यक्‍त केले.या कार्यशाळा आयोजन करण्यासाठी गणित विभाग प्रमुख नलिनी भदाणे, गणित शिक्षक सोनाली पुणेकर, मोनिका कुदळे, आशिष झनझणे, असीम पठाण व प्रणिता भोसले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)