पोतेवाडी रस्ता रुतला चिखलात

दोन वर्षांपासून 1 कि.मी.चे डांबरीकरण रखडले
जामखेड – तालुक्‍यातील जवळके – नान्नज रस्त्यावरील पोतेवाडी फाटा ते पोतेवाडी रस्ता गेल्या दोन वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या भागातील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्याअभावी बेजार होऊन अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यात तर चिखल तुडवतच या रस्त्याने जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नान्नज – जवळके रस्त्यावरील पोतेवाडी फाटा ते पोतेवाडी दोन किलोमीटर अंतरापैकी पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून 1 कि.मी. अंतराचे डांबरीकरण दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यातील 1 कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याअभावी या भागातील शेतात वास्तव्य करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना याच चिखलातून वाट काढत शाळेला ये-जा करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवून राहिलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून शेतकऱ्याची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
गावात उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे अनेकजण शेतात राहण्यासाठी गेले. पावसाळ्यात रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण नसल्याने चार ते सहा महिने नागरिकांना चिखलातूनच वाट शोधावी लागते. गावातील अनेक शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. जनावरे शेतात असल्याने दररोज 15 ते 20 लीटरच्या दुधाचे केन डोक्‍यावर घेऊन चिखलातून कसरत करत नागरिकांना डेअरीत दूध घालण्यासाठी यावे लागते. याच रोडवर बरेच शेतकरी पाय घसरून पडल्याने दुधाचे नुकसान होऊन अनेकांना दुखापतीही झाल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)