पोतराज लोककलेला आर्थिक प्रोत्साहन देण्याची गरज

पारंपरिक लोककला अस्तंगत होण्याच्या मार्गावर

सातारा  – सध्या ग्रामीण भागात मरीआई देवीचे देव्हारे घेऊन पोतराज गावोगावी फिरत आहेत. काळाच्या ओघात त्यांची संख्या कमी होऊ लागली असून सरकारने या लोककलेचे जतन करण्यासाठी कलाकारांना आर्थिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

-Ads-

सातारा तालुक्‍याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या पोतराज घरोघरी मरीआई देवीचे देवारे घेऊन फिरत असून देवीच्या नावाने भिक्षा मागत आहेत. सध्या घरोघरी येणाऱ्या या देवाची महिला आणि पुरुष पूजा करुन त्यांना धान्याच्या रुपाने तसेच अंडी, तेल व दक्षिणा देत आहेत. सध्या अनेक गावांमध्ये हे मरीआईवाले दाखल झाले आहेत.

पूर्वी बरेच लोक या देवीला नवस करायचे; परंतु सध्या काळाच्या ओघात नवस करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही ही लोकपरंपरा सुरु असून येणारा कालखंडातील दिसेनाशी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. लोकसंस्कृती जतन करणाऱ्या या कलाकारांना शासनाने मानधन देऊन लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)