पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने नवरात्रीनिमित्त सरस्वती व्याख्यानमाला सप्ताह

वडगाव मावळ – येथील मावळ विचार मंचाच्या वतीने श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या सहकार्याने नवरात्रीनिमित्त बुधवारी (दि. 10) ते बुधवार (दि. 17) कालावधीत सरस्वती व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले. मावळ विचार मंचाच्या वतीने गेल्या 17 वर्षांपासून नवरात्रीमध्ये व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जात आहे. मंचाचे संस्थापक भास्कर म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे यावर्षीचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी व्याख्यानमालेची माहिती दिली.

येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात बुधवारी (दि. 10) ते बुधवारी (दि. 17) दरम्यान दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्याने होणार आहेत.

-Ads-

बुधवारी (दि. 10) ह.भ.प. नागेश्‍वरी झाडे यांचे जीवनातील संस्कार केंद्र या विषयावर व्याख्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षा लोणावळा नगरसेविका बिंद्रा गणात्रा, गहुंजे ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल बोडके, गुरुवारी (दि. 11) उद्योजक डॉ. रामदास माने यांचे असा घडतो. “उद्योजक’ या विषयावर व्याख्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाडी ग्रामोद्योग मंडळ सभापती विशाल चोरडिया, तर प्रमुख पाहुणे उद्योजक ऋषिकांत शिंदे, शुक्रवारी (दि. 12) पानिपतकार विश्‍वास पाटील यांचे “स्वातंत्र्याची संग्राम युद्धे’ या विषयावर व्याख्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ तहसीलदार रणजीत देसाई, तर प्रमुख पाहुणे उद्योजक अशोक बाफना उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी (दि. 13) कवी नारायण पुरी, कवी भरत दौंडकर व कवी अनिल दिक्षित यांची कवितांची बहारदार मैफल “महाराष्ट्राची काव्यधारा’ कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मादाय आयुक्‍त महेश सरनोबत, तर प्रमुख पाहुणे मावळ प्रबोधिनी संस्थापक रवींद्र भेगडे हजर राहणार आहेत. रविवारी (दि. 14) सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे “देशांतर्गत सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब पठारे, तर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी (दि. 15) चित्रपट अभिनेते अनंत जोग यांचे “माझा अभिनयाचा प्रवास’ या विषयावर व्याख्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिग्दर्शक किशोर बेळेकर तर प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मंगळवारी (दि.16) चित्रपट अभिनेते योगेश सोमण यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर आपले विचार व्यक्‍त करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार श्रीरंग बारणे, तर प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके असतील. बुधवारी (दि.17) प्रा. संजय कळमकर यांचे “कथाकथन’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाळा भेगडे, तर प्रमुख पाहुणे मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आहेत. गुरुवारी (दि. 18) रोजी विजयादशमीनिमित्त विजयादिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेचे नियोजन अध्यक्ष अतुल राऊत, कार्याध्यक्ष अभिलाष म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख सुनीत कदम, उपाध्यक्ष विनायक चिखलीकर, सचिव दीपक भालेराव, खजिनदार अतुल म्हाळसकर, सहखजिनदार किरण आचार्य, ऍड. विजय जाधव, ऍड. अजित वहिले, ऍड. पवन भंडारी, ऍड. धनंजय काटे, ऍड. मिलिंद ओव्हाळ, रवींद्र म्हाळसकर आदी करणार आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)