पोटासाठी जीवघेणी कसरत

महादेव टिंगरे सायकलवर खेळ करून केला जातो उदरनिर्वाह

केडगाव- पोटासाठी सायकलवर जीवघेणी कसरत करून उपजिविका सुरू असून विविध शाळा आणि गावांतील चौकात सायकल खेळ करीत आहे, अशी व्यथा कलाकार महादेव जनार्दन टिंगरे (वय 58) यांनी सांगितली.
गुरुवार (दि. 20) खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालय येथे सायकल कसरत खेळ करून मनोरंजन करण्यासाठी आले असता, ते बोलत होते. टिंगरे हे मूळचे लिमटेक (ता. बारामती) येथील रहिवासी असून मागील कित्येक वर्षांपासून सायकलवर वेगवेगळे कलागुण आणि कसरती करून ते स्वतःबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. खुटबाव विद्यालयात त्यांनी सायकलवर विविध कसरती केल्या आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. खेळ संपल्यावर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आम्ही सर्व कलाकार कला दाखवून उपस्थितांचे मनोरंजन करतो; परंतु देशाचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या कलाकार मंडळींना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सुविधा मिळत नाहीत. शासनाने त्यांच्या कलेची दखल घेऊन कलाकार मंडळींना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या या कलेत संजय शिंदे आणि मुख्याध्यापक रंधवे यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे ते सांगायला विसरले नाहीत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)