पोटनिवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल

हडपसर : पालिकेच्या मुंढवा-मगरपट्टासिटी प्रभाग क्रमांक 22 “क’च्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी (दि 20) शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पूजा कोद्रे, भाजपकडून सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेकडून मोनिका तुपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काही अपक्ष उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत.

राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे यांनी उमेदवार अर्ज दाखल केला यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी उपमहापौर बंडु गायकवाड, निलेश मगर, नगरसेविका हेमलता मगर, संदीप कोद्रे, स्मिता लडकत, कॉंग्रेसचे प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते. भाजपकडून सुकन्या गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती सदस्य मारुती तुपे, नगरसेवक गोपाळराव चिंतल, उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, नगरसेवक संजय घुले, शहर भाजप कार्यकारिणी सदस्य माऊली कुडले उपस्थित होते.

तर, शिवसेनेकडून मोनिका समीर तुपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, नगरसेविका प्राची अल्हाट, शिवसेना शहर उपप्रमुख समीर तुपे, माजी नगरसेवक विजय देशमुख, अमोल हरपळे, उल्हास तुपे व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)