पोटनिवडणुकीच्या निकालातून देशाचा बदलता मूड सूचित-कॉंग्रेस 

नवी दिल्ली: कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत भाजपला बसलेल्या झटक्‍याने कॉंग्रेसच्या गोटात खुशीची लाट पसरली आहे. त्यातून पोटनिवडणुकीच्या निकालातून देशाचा बदलता मूड सूचित होत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्नाटकमधील बातमी अतिशय आशादायी आहे. त्यातून देशातील मूड प्रतिबिंबित होतो. देशात झालेल्या मागील दहा पोटनिवडणुकांत कॉंग्रेस आणि इतर पुरोगामी शक्तींनी भाजपचा पराभव केला, असे कॉंग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम्‌ यांनी कर्नाटकमधील 4-1 हा निकाल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील कसोटी मालिका विजयाप्रमाणे भासत असल्याचे ट्‌विट केले.

दिवाळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. द्वेष, असहिष्णुता हे आधुनिक जगातील राक्षस आहेत. नवे वर्ष प्रेम, सहिष्णुता आणि घटनात्मक मुल्यांचा विजय घेऊन येवो, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, कर्नाटकमधील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरवरून पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)