पोटनिवडणुकांपासून निवडणुकीच्या राजकारणाची सुरूवात 

कमल हसन यांचे प्रतिपादन 

चेन्नाई – मक्‍कल नीधी मैय्यम या स्वताच्या राजकीय पक्षाची अलिकडेच स्थापना करणारे अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडुतील 20 पोटनिवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणुकीच्या राजकारणाचा श्रीगणेश करण्याचे ठरवले आहे. त्यांनी सांगितले की या पोटनिवडणुका जेव्हा केव्हा होतील त्यावेळी आम्ही तेथे आमचे उमेदवार उभे करणार आहोत. मद्रास उच्च न्यायालयाने अद्रमुकच्या बंडखोर गटाचे 18 आमदार अपात्र ठरवले असून अन्य दोन आमदारांचे निधन झाल्याने या 20 मतदार संघात लवकरच पोट निवडणुका घ्यावा लागणार आहेत.

त्या सर्व मतदार संघात आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत असे कलम हसन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निकोप राजकारण करणे हे आपले प्रमुख उद्दीष्ठ आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की मी जेथे जातो तेथे लोकांना कोणतेच आश्‍वासन देत नाही. पण लोक मात्र आमच्या पक्षाला मतदान करण्याचे आश्‍वासन देतात. यापुर्वी आम्ही पैसे घेऊन मतदान करीत असू पण आता मात्र आम्ही तसे करणार नाहीं असे आश्‍वासनही मतदारांकडून आपल्याला मिळत असते असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)