पोटच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या बापास पोलीस कोठडी

पुणे – पत्नी घरी नसताना पोटच्या तेरा वर्षांच्या मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी पित्याला अटक केली. विशेष न्यायालयाने त्याला 23 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपीच्या पत्नीने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी असून फुरसुंगी येथे पती आणि तेरा वर्षांच्या मुलीबरोबर राहतात. फिर्यादी या काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपराध केल्यापासून आरोपी हा फरार होता. त्याने अशा प्रकारचे कृत्य आणखी कोणाबरोबर केले का? याचा तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)