पोटच्या गोळ्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर उमलले हास्य

प्रशांत जाधव,

दि. 30 साधारणपणे एक महिन्यापुर्वी मानसिक धक्का बसला अन्‌ तिने घर सोडुन बाहेरचा रस्ता धरला. त्या मानसिक धक्‍यातच तीने मजलदरमजल करत दोनशे कि.मीचा प्रवास केला .चक्क शिरवळ गाठले. तिला बसलेला धक्का ऐवढा तीव्र होता की ती स्वत:चे नाव,गाव ती विसरली. शिरवळ पोलिसांनी तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला,पण पदरी अपयश आले.अखेर पोलिसांनी तिला साताऱ्यातील यशोधन निवारा केद्रांत दाखल केले.
साधारण 9 जुलै रोजी शिरवळ पोलिस स्थानकात पंचवीशीतील युवती सापडली होती. शिरवळ (सातारा)पोलिसांनी त्या मुलीला नाव, गाव, विचारले पण तिला सांगता आले नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे अवघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला सातारा शहरातील रवी बोडले यांच्या यशोधन निवार केंद्रात दाखल केले . यशोधन मध्ये दाखल केल्याने पोलिसांचे काम झाले, पण तिच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात देण्याचे मोठे दिव्य रवी बोडकेंच्या यशोधन निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी उचलले होते. ती युवती बोलली तरच तिला नातेवाईकांच्या ताब्यात देता येणार होते. त्यामुळे रवी बोडके यांनी त्यांच्या संस्थेतील महिला कर्मचारी पुनम पोतेकर यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली होती. पुनम यांनी आपले सर्व कसब पणाला लावत अखेर तिला बोलते केलेच. त्या युवतीने अखेर स्वत:चे नाव सुरेखा अंकुश आखाडे असे सांगत कोंडावळे जि. पुणे असा पत्ता सांगितला. मग सुरू झाला तिच्या घरच्या लोकांचा शोध. त्यानंतर सवी बोडके व त्यांचा सहकारी विश्‍वास यांनी महिलेसह पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रथम तिने आपली एक बहिण कोथरुड मध्ये राहत असल्याचे सांगीतले. ती सांगेल त्या पत्त्यावर गाडी जात होती पण अनुभव मात्र वेगळाच येत होता. पोहचलेल्या पत्त्यावर असलेली लोक तीला ओळखत नसल्याचे सांगत होते.कोथरूड, भवानीनगर असे अनेक परिसरार फिरून झाले, पण तिच्या नातेवाईकांचा शोध काही लागत नव्हता. तिने परत बिबवेवाडीत आपली एक बहणि राहत असल्याचे सांगीतले. त्यानुसार शोध सुरू असताना एका घरासमोर तिने गाडी थांबवण्याची विनंती केली. समोरील एका घरात चला असे म्हणत ती पुढे निघाली. तिने एका घराची बेल वाजवली त्यावेळी घरातून बाहेरत आलेल्या महिलेने तीला ओळखत ती आपली बहीण असल्याचे सांगीतले. त्यानंतर जी काही माहिती समोर आली ती थक्क करणारी होती.
सुरेखाचे पुणे जिल्हातील पौंड जवळील कोढांवळे गावात लग्न झाले आहे. नवरा शेती करतो तर तिला आशा, अर्पिता,अर्णव ही तीन मुले आहेत. सुरेखा घर सोडून गेली तेव्हापासून त्यांनी तिच्या आठवणीने घर डोक्‍यावर घेतले होते. हे ऐकताच बोडके यांची टीम तिच्यासह रात्री बारा वाजता पौंड पोलिस स्टेशनला पोहचले. पोलिसांच्या मार्फत घरच्या लोकांसी संपर्क साधला. नातेवाईकांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी नातेवाईकांच्या सोबत आलेल्या आशा, अर्पिता,अर्नव यांना पाहताच गेली कित्येक दिवस निशब्द असलेली सुरेखा बोलती झाली. पोटच्या गोळे पोटाला बिलगताच तिच्या डोळ्यातील अश्रृंना वाट मोकळी झाली.
—————————————————————————
मामा तुम्ही खुप चांगले आहात
घर सोडून गेलेली आपली आई सुखरूप परत आल्याने खुश झालेल्या सुरेखाच्या लेकरांनी ती परत कुणामुळे आली असा सवाल केला. त्यावेळी पोलिसांनी साताऱ्यातील यशोधन निवार केंद्राचे रवी बोडके यांच्याकडे बोट दाखवले. आई परत आल्याने खुश असलेल्या लेकरांचा आनंद मोठा होता. पण तरीही सुरेखाची मुलगी आशा हीने बोडके यांच्या हाताला घरून मामा तुम्ही चांगले आहात असे म्हणताच उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)