पोटगी परत देण्यासाठी पतीची पत्नीला धमकी

पिंपरी –पोटगी परत देण्यासाठी पतीने पत्नीच्या माहेरी जाऊन पत्नी व माहेरच्या व्यक्तिंन धमकावले. ही घटना रुपीनगर तळवडे येथे घडली.

याप्रकरणी पत्नी शहाना शहामोहम्मद शेख (वय.26) यांनी पती इक्राम शेख (वय-32) रिफाकत इस्लाम शेख (वय-28) शहनाज शेख (वय 30) अब्दुल अहमद शरीफ शेख, सलामुद्दीन शेख यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपींने फिर्यादी यांच्या वडीलांच्या घरी जाऊन फिर्यादी व त्यांचे आई-वडील व भाऊ यांना शिवीगाळ करत तुम्ही घटस्फोटावेळी दिलेली साक्ष माघारी घ्या व आम्ही दिलेली पोटगी देखील माघारी द्या; नाही तर जिवे मारून टाकू अशी सर्वांना धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)