पोखरी फाटा येथे जीपच्या धडकेत एक ठार

जीप सोडून चालक पसार: पोलिसांकडून वाहन जप्त

जामखेड  – रिक्षा येण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशाचा भरधाव जीपनेधडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. नगर – जामखेड रस्त्यावरील पोखरी फाटा बसथांब्यावर रविवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर जीपचा चालक पसार झाला. जामखेडपासून सात कि .मी. अंतरावरील पोखरी फाटा येथील बस थांब्यावर क-हेवडगाव येथील अप्पा मारुती खांडवे(वय 46) जामखेड येथे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभे होते.

सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नगरकडून जामखेडकडे भरधाव निघालेल्या क्रुझर जीपने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर जीपचालक जामखेड येथेजीप सोडून पसार झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले. रविवारी रात्री येथील ग्रामीण रुग्णालयात खांडवे यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)