पोक्‍सो प्रकरणातील पिडितांना पोलीस ठाण्याच्या वाऱ्या का ?

हायकोर्टाचा पोलिसांना संतप्त सवाल
मुंबई – पोक्‍सो प्रकरणात वारंवार पिडीत मुलांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास भाग पाडणाऱ्या अंधेरी पोलिसांना उच्च न्यायालयाने आज चांगलेच धारेवर घेतले. पोक्‍सो प्रकरणांमध्ये लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना कोणत्या कायद्यात बोलविले जात होते, असा संतप्त सवाल न्यायमूर्ती रेवती मोहित-ढेरे यांनी उपस्थित करून पोलीस स्टेशन डायरी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.

पोक्‍सो प्रकरणी अंधेरीतील एका नामांकित शाळेच्या फ्रेंच नागरिकत्व असलेल्या विश्‍वस्ताला सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला जावा, अशी विनंती करणारी याचिका पिडीतेच्या आईबरोबर अन्य 42 विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहित-ढेरे यांच्यासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी पीडीत मुलीला आणि तिच्या पालकांना चौकशीसाठी वारंवार पोलीस स्टेशनमध्ये बोलावले जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. यावर न्यायालयाने संताप व्यक्त करून मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पिडीत मुलीच्या घरी पोलिसांनी जाऊन चौकशी करायची का पिडीत मुलीला आणि पालकांना पोलीस ठाण्यात बोलायचे, हे काणत्या कायद्यात बसते. जर अशा प्रकारे पोलिच पिडीत आणि तक्रारदारांना छळत असतील तर तक्रारदार पुढेच येणार नाहीत. याचे भान पोलिसांना नाही का? असा सवालही न्यायालयाने उपस्थित करून 2 एप्रिलला पोलीस डायरी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)