पोक्सो केसमधील पीडित मुलांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावणे बेकायदेशीर-न्यायालय

मुंबई : पोक्सो केसमध्ये लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावणे बेकायदेशीर आहे. पोलीस हे करुच कसे शकतात? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने एमआयडीसी पोलीस स्टेशनची डायरी उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जर पोलिस पीडित आणि तक्रारदारांना छळत असतील तर तक्रारदार पुढेच येणार नाहीत, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अंधेरीतील एका नामांकित शाळेच्या फ्रेंच नागरिकत्व असलेल्या ट्रस्टींना सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित परदेशी नागरिकावर तीन वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्काराचा आरोप आहे.

या केसमध्ये मुंबई पोलिसांनी पीडित मुलीला तिच्या पालकांसह चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये वारंवार बोलावल्याची गोष्ट याचिकाकर्त्यांनी बुधवारी उच्च न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे.

कायद्यानुसार पोलिसांनी पीडित अथवा तक्रारदाराच्या घरी जाऊन चौकशी करणे अपेक्षित आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. दोन एप्रिलला उच्च न्यायालय यावर आपला निकाल देणार आहे. तीन वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या ‘त्या’ विदेशी विश्वस्तांना शाळेत जाण्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. तसेच इतकं गंभीर प्रकरण अतिशय हलगर्जीपणाने हाताळणाऱ्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)