पोंभुर्ले येथे आज राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

फलटण – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने “राज्यस्तरीय पत्रकार दिन’ व “सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण’ समारंभ रविवार, दि. 6 रोजी स.10:30 वाजता पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील “दर्पण’ सभागृहात आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे (गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) यांच्या हस्ते व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकारिता अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख ऍड. वसंत सप्रे, रत्नागिरी जि. प.चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी दिली. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, विश्‍वस्त सुहास रत्नपारखी, अमर शेंडे, रोहित वाकडे, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच सादिक डोंगरकर, मधुकर व सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)