पोंदेवाडीत गडदादेवी ग्रामविकास पॅनेल विजयी

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत गडदादेवी ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. सरपंच पदाचे उमेदवार अनिल वाळुंज आणि त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्‍यांनी निवडुण आले आहेत.
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसने वर्चस्व मिळवले. सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. यामध्ये अनिल किसन वाळुंज यांनी प्रकाश हारके यांचा पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ग्रामपंचायत सदस्य संदेश जयसिंग पोंदे, सुनिता बाळासाहेब ईरकर आधीच बिनविरोध निवडुण आले होते. सरपंच पद व पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी अनिल किसन वाळुंज तर सदस्यपदी लता कैलास गायकवाड, महेंद्र पांडुरंग पोखरकर, कावेरी अमोल वाळुंज, संदीप लक्ष्मण पोखरकर, कृष्णाली निलेश पडवळ निवडुण आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)