पॉलिशच्या बहाण्याने दिड लाखांचे दागिने लंपास

कापूरहोळ-“सोने, चांदीचे दागिने पॉलीश करून देतो’, असे सांगून दोन अनोळखी व्यक्तींनी नसरापूर (ता. भोर) येथील वनविहार सोसायटीतील महिलेचे हातचलाखीने दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
याबाबत राजगड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार नसरापूर येथील वनविहार सोसायटीतील निलीमा शशिकांत धुमाळ (वय 46) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीतील माहिती नुसार नसरापूर येथील वनविहार सोसायटीत 10 जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्‍ती आल्या. त्यांनी धुमाळ यांच्या हातातील चांदीची अंगठी पॉलिश करून देतो, असे सांगत इतर सोन्याचे दागिनेदेखील पॉलीश होतील, असे सांगितले. कुकरच्या भांड्यात हळद टाकून त्यामध्ये दागिने टाकावयास सांगितले. त्यानंतर हातातील साबण कुकरच्या भांड्यात फिरविण्याच्या बहाण्याने भांड्यातील दागिने हातचलाखीने लंपास केले. दागिने थोड्या वेळाने कुकरच्या बाहेर काढा, असे सांगून त्यांनी लगोलग पळ काढला. धुमाळ यांनी काही वेळाने दागिने पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाहिले असता, दागिने आढळले नाहीत.
या घटनेबाबत राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे म्हणाले, नागरिकांना सोने, चांदीचे दागिने पॉलीश करून देतो, अशा भूलथापांना बळी पडू नये. जर कोणी असे सांगून संशयास्पद हालचाल करत असेल तर नागरिकांनी तातडीने राजगड पोलिसांशी संपर्क साधावा, अथवा 9689926760 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)