पॉन्टिंग हॉल ऑफ फेममध्ये दाखल ; आयसीसीने केली घोषणा

मेलबर्न:ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा समावेश आयसीसीने “हॉल ऑफ फेम’मध्ये करताना त्याला ख्रीसमसचे गिफ्ट दिले आहे. मेलबर्न येथे सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याआधी पॉन्टिंगला हा सन्मान प्रदान करण्यात आला. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला पॉन्टिंग हा 25 वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

माजी जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या हस्ते रिकी पॉन्टिंगला खास कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. याबाबत रिकी पॉन्टिंग याने आपल्या भावना व्यक्त केल्या. हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे ही खरच खूप आनंददायी गोष्ट आहे. त्यातही मेलबर्नच्या मैदानावर हा सन्मान होणे हे तर त्याहीपेक्षा सुखद आहे. अशा शब्दात त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)