अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना देशात दिवसेंदिवस वाढत असतना त्याला आता कायद्यानेच लगाम लावण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. त्यातच ‘पॉक्सो’ कायदा आणखी कठोर करण्याच्या निर्णयाला अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने ठाम पाठिंबा दर्शवला आहे.
लहानग्यांवरील अत्याचार ही मानवतेला लाज आणणारी आणि घृणास्पद बाब आहे. असे अमानुष कृत्य करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे अनुष्काने म्हटले आहे. दरम्यान, कालच ‘पॉक्सो’ कायद्यातील अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसारआता यापुढे अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0