#पॉकेट टिप्स : लॉनविंग लॅम्प

दसरा  दिवाळी सण की, घर अनेक प्रकारच्या ‘रोषणाई’ने उजळीं निघते आणि त्यामुळे घराला एक आकर्षक लूकही मिळतो. पूर्वी लाईटच्या माळा, आकाशकंदील इतकेच मर्यादित पर्याय आपल्यासमोर होते; परंतु आता काळ बदलला आहे. आज बाजारात अनेक अत्याधुनिक पद्धतीचे आकर्षक “लॅम्प’ उपलब्ध आहेत. गोल, उभट किंवा तत्सम आकर्षक स्वरूपातील आकाराचा आणि स्टेनलेस स्टिलपासून बनलेला “लॉनविंग’ हा त्यातीलच एक आगळा-वेगळा प्रकार म्हणावा लागेल. पॉकेट टिप्स्‌च्या माध्यमातून याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ…

– घरातील लिव्हिंग रूम अथवा बेडरूममध्ये याचा वापर करता येतो आणि सजावटीच्या दृष्टीने तो अधिक प्रभावी दिसतो.
त्याचबरोबर हॉटेल, कॅफे, बार, स्टोर, फाईव्ह स्टार कमर्शिअल ऑफिसेस या ठिकाणीही “लॉनविंग लॅम्प’चा वापर आपण करू शकतो.

– वेगवेगळ्या नामांकित कंपन्या याचे उत्पादन करीत असून मूळचे हे चीनचे “प्रॉडक्‍ट’ म्हणून प्रसिद्ध आहे.

– यामध्ये “एलईडी’चा वापर केल्यास ते अधिक आकर्षक व नयनरम्य दिसते. तसेच “एलईडी’चा प्रकाश डोळ्यालाही सुखकारक असतो.

– सिंलिंगला लटकवून ठेवल्याने एका कोपऱ्यांत किंवा अगदी सेंटरला हा लॅम्प लावल्यास त्याचा प्रभाव अधिक पडू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)