पैसे मोजत उभारलेल्या व्यक्तीच्या हातातील सहा हजार दुचाकीवरील चोरट्यांनी लांबविले

पुणे – रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पैसे मोजत उभ्या असलेल्या युवकाच्या हातातून सहा हजार रूपयांची रोकड हिसकावून चोरट्याने धूम ठोकली. भवानी पेठेतील कुमार सोसायटीजवळ जुना मोटार स्टॅण्ड चौकाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली.
रिहान शेख (वय 20, रा. 722, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चोरट्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
फिर्यादी रिहान शेख हा मंगळवारी दि. 26 जुन रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील रस्त्याने घरी जात होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा राहून त्यांनी खिशातील नोटा काढल्या आणि सदर दहा हजारांची रक्कम मोजून त्यातील चार हजार रूपये खर्चासाठी खिशात ठेवले. उर्वरित सहा हजार रूपये पुन्हा मोजत असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने फिर्यादी युवकाच्या हातातील रक्कम हिसकावून घेतली. रिहान याने त्याला प्रतिकार केला. मात्र, आरोपीने त्याच्याशी झटापट करीत तेथून धूम ठोकली. सहायक निरीक्षक जे.सी. मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)