राजेगाव- आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे, याची प्रचिती देणारे उदाहरण भिगवण येथील सर्वसामान्य कृत्यातून समोर आले आहे. सोन्याचे ब्रेस्लेट रस्त्यावर मिळाल्यानंतर भिगवणमधील लक्ष्मण घोगरे आणि माऊली आंबेकर यांनी प्रामाणिकपणा दाखवत त्या सोन्याच्या ब्रेस्लेट मूळ मालकाचा शोध घेऊन त्यास ते परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा प्रामाणिक मनाची श्रीमंती थोर असल्याचा प्रत्यय आला.
2.5 तोळ्याचे अर्थात 75 हजार रूपयांचं सोन्याचं ब्रेसलेट सोलापूर हायवे लगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर हरवले होते. दोन दिवस या विषयाची चर्चा चालू होती. दोन दिवसापूर्वी अचानक गावातीलच ग्रामस्थ लक्ष्मण घोगरे ऊर्फ प्यारेलाल यांचा नितीन कदमला फोन आला. आमच्या घरी या थोडंसं काम आहे. नितीन त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी नितीनला विचारले तुमची हरवलेली एक वस्तू मला सापडली आहे. नितीन कदम यांना घरी बोलावून त्यांना ते ब्रेस्लेट परत देताना करताना लक्ष्मण घोगरे ऊर्फ प्यारेलाल यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)