पैशाच्या जोरावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उचलायची भाजपची कार्यपद्धती: पृथ्वीराज चव्हाण

सरकार मराठा आरक्षण देण्यात अप्रामाणिक 
मुंबई: सांगली महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा झालेला पराभव आपणाला मान्य आहे. शेवटी पराभव हा पराभवच असतो. पैशाच्या जोरावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उचलायची ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच ही कार्यपद्धती फार काळ टिकत नसल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खाजगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. प्रामुख्याने अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याबाबत खरपूस समाचार घेतला. तसेच भाजप सरकारने दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. सांगली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे झालेला पराभव मान्य करत पराभव हा पराभवच आहे, पण तो का झाला याची माहिती घेणे सध्या सुरू आहे. परंतु पैशाच्या जोरावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उचलायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे. अशी टीका करत ही फार काळ टिकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जानेवारी-फेब्रुवारी 2019ला लोकसभा निवडणुका होण्याचे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून जीएसटी, नोटाबंदी हे सर्व फसल आहे. जर पुन्हा ही जोडगोळी निवडून आली तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आल्या असल्याची त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त आहे. हा प्रश्न ज्वलंत आहे, परंतु हे सरकार आरक्षण देण्यात प्रामाणिक नाही. त्यामुळे आश्वासन पूर्ण करता न आल्याने सरकारने जनतेची माफी मागावी आणि हात मोकळे करावे, असे देखील त्यांनी म्हटल आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)