पैशांच्या उसनवारीतून तिघा मित्रांनीच केली हत्या

– वाघोलीतील पेंटरच्या खुनाच्या तपासात पोलिसांना यश

वाघोली – लोणीकंद-12 वा मैल येथे झालेल्या पेंटरच्या खुनाचा उलगडा करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले असून पेंटर उसने पैसे घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याने सणसवाडी येथील तीन मित्रांनीच त्याचा चाकूने गळा चिरून खून केला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली असून 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दत्ता राम भोसले याचा त्याच्याच खोलीत खून करण्यात आला होता. पोलिसांनी प्रमोद श्रीकांत काशीद (वय 27, बीड), अतुल नाथराव मुसळे (वय 20, लातूर), अमोल तानाजी चौधरी (वय 26, पंढरपूर) सध्या सर्व रा. सणसवाडी, शिरूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंटर दत्ता भोसले व तिघांची मैत्री होती. त्यांच्याकडून भोसले याने वेळोवेळी पैसे घेतले होते. पैसे परत मागितले असता भोसले पैसे न देता शिवीगाळ आणि मारहाण करीत असे. याचा राग मनात धरून तिघांनी 22 मार्चच्या रात्री भोसले याच्या घरातच चाकूने गळा चिरून खून केला होता. खून केल्यानंतर तिघे बाहेरून कडी लावून पसार झाले होते. पोलिसांनी शेजारी व इतरांकडे चौकशी केल्यानंतर प्रमोद काशीद, अतुल मुसळे, अमोल चौधरी यांनी खून केल्याचे उघडकीस आले. लातूर, उस्मानाबाद येथे तपास करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, महेश चव्हाण, पो.उप. निरी. पिंगुवाले, स. पोलीस उपनिरीक्षक टी. आर. चांदीलकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, दत्तात्रय गायकवाड, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, प्रशांत गायकवाड, वैजनाथ नागरगोजे, चंद्रकांत माने , संतोष मारकड, समीर पिलाने, कुलथे, बाळासाहेब गाडेकर, विकास कुंभार या पथकाने काम केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)