पैकीच्या पैकी

गाजराची पुंगी

“”गोविंदराव, आज मी तुम्हाला माझी एक वेगळी इच्छा सांगणार आहे.”
“”सांगा. कोणती?”
“”मला एस.एस.सी. परीक्षेला पुन्हा बसायचंय.”
“”काय? ही काय अवदसा आठवली तुम्हाला?”
“”अहो मनःकामनापूर्ती.”
“”म्हणजे?”
“”मी पन्नास वर्षांपूर्वी एस.एस.सी. झालो. तेव्हा कसाबसा काठावर पास झालो. मी अभ्यासात तसा बरा होतो. पण आमच्यावेळी एवढे मार्क मिळत नव्हते.”
“”हो मी 1952 साली एस.एस.सी. झालो. मला हुशार विद्यार्थी असूनही साठ टक्के गुण मिळाले होते. आमच्यावेळी बोर्डात पहिला आलेल्या आमच्या मित्राला बहात्तर टक्के गुण मिळाले होते.”
“”तेच सांगतोय मी. आता बघा. गुणांची खरैता आहे.”
“”म्हणजे आजच्या काळातली पोरं आपल्या काळातल्या आपल्यासारख्या पोरांपेक्षा खूप हुशार आहेत आणि आपण अगदीच मठ्ठ होतो असं म्हणावं लागेल.”
“”तसं म्हणा हवं तर. पण आता पैकीच्या पैकी गुण मिळवणारे कितीतरी विद्यार्थी असतात. अहो. मराठीत शंभरपैकी शंभर गुण मिळालेले तुम्ही कधी ऐकलेत का?”
“”कधीच नाही.”
“”पण आता मिळतात.”
“”वा. म्हणून तर मला या पोरांचं कौतुक वाटतं.”
“”पोरांचं कौतुक करा. पण त्याचबरोबर त्यांना इतके गुण देणाऱ्यांचंही कौतुक करा.”
“”केलंच पाहिजे. त्यांच्या या उदार धोरणाबद्दल कौतुकच केलं पाहिजे.”
“”का हो पण गोपाळराव, शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या या पोरांना शंभर टक्के ज्ञान असतं त्या विषयाचं असं म्हणायचं का?”
“”अहो गोविंदराव, मार्कांचा आणि ज्ञानाचा काहीही संबंध नाही.”
“”म्हणजे?”
“”आजचे विद्यार्थी, पालक, शिक्षण, सगळी शिक्षणव्यवस्थाच मार्क्‍सवादी झालीय. म्हणून तर एवढे गुण पडतात.”
“”म्हणूनच मला पुन्हा एकदा एस.एस.सी. परीङेला बसून माझी अपूर्ण इच्छा पूर्ण करायची आहे. मला पैकीच्यापैकी गुण मिळवायचेयत.”
“”पण त्यासाठी तुम्हाला अर्ज भरणे, परीक्षा देणे हा सकळा खटाटोप या वयात करावा लागेल. कशाला त्या फंदात पडता?”
“”हो आणि बसलो परीक्षेला तरी मला पैकीच्या पैकी गुण पडतीलच असं नाही.”
“”त्यासाठी तुम्हाला नवं परीक्षातंत्र माहीत हवं.”
“”मग नकोच. इथूनच नमस्कार!पैकीया पैकीला सलाम!”

– जोनम जोहरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)