पिंपरी-चिंचवड : “पे ऍण्ड पार्क’ धोरणाचा निषेध

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्तावित असलेल्या “पे ऍण्ड पार्क’चा संभाजी ब्रिगेड संस्थेकडून निषेध व्यक्‍त करण्यात आला आहे.

संभाजी बिग्रेडने म्हटले आहे की, सामान्यांना आधीच महागाईने हतबल केलेले असताना, आता पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनांवर तासाला शुल्क आकारण्याचा फतवा महापौर नितिन काळजे यांनी काढला आहे. शहरात मेट्रोचे काम सुरू आहे.

या प्रकल्पाचे काम चांगले आहे. पण याच्या नावाखाली “पे ऍन्ड पार्क’ करण्याचा प्रयत्न झाला आहे. केंद्र सरकारने याची तरतूद देखील केली नाही. तरीही हे शूल्क सामान्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम यांनी दिली. “पे ऍन्ड पार्क’ धोरणा विरूद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण कदम यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)