पेरूवाले आता गाडीवर

जस जसा काळ बदलतोय तस तसे सर्व क्षेत्रात बदल घडत आहेत. त्यापैकीच एक प्रकार काल निदर्शनास आला. लहानपणापासून पेरूवाले काकांना नेहमी सायकल अथवा हातगाड्यांना पेरूची विक्री करताना पहायची जणू सवयच लागली होती. मात्र, आता पेरूवाले काकांनी सायकल व हातगाड्याची साथ सोडून आता चक्क मोपेडवरून पेरूची विक्री सुरू केली आहे.

साताऱ्यातील झेडपी चौक ते विसावा नाका रस्त्याच्या डाव्या बाजूला फळे विक्रेत्यांची मोठी रांगच असते. अशा रांगेत चक्क पेरूची टोपली मोपेडच्य सीटच्या मागील बाजूला बांधली होती. वयस्क पेरू विक्रेत गाडी रस्त्याच्या कडेला लावून झाडाखाली बसले होते.

-Ads-

साहजिकच कुतुहूल म्हणून त्यांना विचारले ते म्हणाले, आता वय 80 झाले आणि गुडघे ही साथ देत नाहीत. मात्र, परिस्थिती बेताची असल्यामुळे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून गाडीवरून पेरूची विक्री करत आहे. पेट्रोलचा खर्च वाढला असला तरी त्याचा पेरू विक्री किंमतीवर परिणाम होवू दिला नाही. त्यांचे बोल ऐकून मन हेलावले. काळ आणि साधने बदलली असली तरी श्रमिकांची स्थिती मात्र आजही बदलली नाही हेच या प्रसंगाने अधोरेखित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
7 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)