पेमदरा वेशीजवळील अपघातात एकाचा मृत्यू

आणे- कल्याण-नगर महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील पेमदारा वेशीजवळ झालेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनासमोर झालेल्या धडकेत एक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी.
बुधवारी (दि. 3) सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान पेमदारा वेशीजवळ कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्र. एमएच 14 जीव्ही 1284) व नगरच्या दिशेने जाणारी दूध वाहतूक करणारी चार चाकी यांत समोरासमोर धडक झाली. यात चारचाकीतील विनोद किसन आहेर (वय 36, रा. आणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील तिघांपैकी एक गंभीर जखमी व दोघे किरकोळ जखमी आहेत. जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एस. व्ही. घाडगे, पोलीस नाईक एस. एस. फड, पोलीस कॉन्स्टेबल जी. ए. हसे, ए. डी. नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, पुढील तपास एस. व्ही. घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)