पेप गार्डिओला समोर सिटीला पहिले स्थान गाठण्याचे आव्हान

मॅंचेस्टर: पेप गार्डिओलाने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टर सिटीचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर मागील वर्षी जबरदस्त कामगिरी करत लीगचे विजेतेपद पटकाविले होते. मागील वर्षी ईपीएलमध्ये ख्रिसमसच्या सुट्या लागल्या तेव्हा मॅंचेस्टर सिटी अव्वल स्थानी विराजमान होती आणि त्यांच्याकडे 11 गुणांची आघाडी होती.

परंतु, या मोसमात ते 44 गुणांसह दुसऱ्या स्थानी असून पहिल्या स्थानी असलेल्या लिव्हरपूलच्या तुलनेत त्यांचे 4 गुण कमी आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या टोटीनहॅम हॉट्‌सपुरस संघाचे 42 गुण आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या आणि पहिल्या स्थानासाठी मोठी झुंज द्यावी लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मॅंचेस्टर सिटीचा प्रीमियर लीगमधील पुढील सामना 3 जानेवारी रोजी अव्वल स्थानी असलेल्या लिव्हरपूलशी आहे. या सामन्यात विजय मिळवून पहिल्या स्थानाच्या नजीक जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. सिटीच्या तुलनेत कमी बलाढ्य असलेल्या क्रिस्ट्‌ल पॅलेसविरुद्ध 3-2 असा पराभव झाल्याने सिटी संघाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)