पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून शिंदेवाडीचा सन्मान

पाचगणी – तालुक्‍यात पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून शिंदेवाडीने बहुमान प्राप्त केला आहे. या ग्रामपंचायतीचा इतरांनी आदर्श घ्यावा, यापुढे शिंदेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अभिवचन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले. शिंदेवाडी (ता. जावळी) येथील ग्रामपंचायतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानकुमरे बोलत होते.

यावेळी जावळीच्या सभापती अरुणाताई शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, तहसिलदार रोहिणी आखाडे, सपोनि जीवन माने पाचगणी पालिकेच्या नगरसेविका हेमा गोळे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहा. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, विस्तार अधिकारी, सूर्यकांत निकम, विस्तार अधिकारी मासाळ, उद्योजक दिलीप घाडगे सरपंच धनश्री शिंदे, उपसरपंच गणेश शिंदे, सदस्य गोविंद शिंदे, आरती शिंदे, सुषमा खंडागळे, मिलिंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे फेटे बांधून वाद्यांच्या निनादात जल्लोशी स्वागत करुन वृक्षारोपण करण्यात आले. तर नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‌घाटन फीत कापून करण्यात आले. बायोमेट्रिक ग्रामसभेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. प्रारंभी स्वच्छ सर्वेक्षनात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश फडतरे म्हणाले, पेपरलेस ग्रामपंचायतीच्या बिरुदानंतर या छोट्या ग्रामपंचायतीने बायोमेट्रिक ग्रामसभेचे केलेले नियोजन कौतुकास्पद आहे.

दत्ता गावडे म्हणाले, माणसाच्या मनाचा विकास झाला की गाव आपोआपच विकसनशील होते हे शिंदेवाडीकारांनी दाखवून दिले आहे. गावाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सर्व खर्च आपण करणार असल्याचे त्यानी सांगितले. अरुणा शिर्के, तहसिलदार रोहिणी आखाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

रौप्य महोत्सवानिमित्त आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, शालेय व कौशल्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या महिला, विद्यार्थी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तर ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सर्वानी श्रमदानातून केलेल्या कामांची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली.

यावेळी बेलोशीचे माजी सरपंच गोपाळ बेलोशे, रुईघरचे माजी सरपंच संतोष बेलोशे, काटवलीचे उपसरपंच दत्तात्रय सुतार, ग्रामस्थ, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंकुश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले धनश्री शिंदे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मिलिंद शिंदे यांनी केले तर धनराज व्हाट्टे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)